61 पण ख्रिस्त शांत राहिले आणि त्यांनी काही उत्तर दिले नाही.
नंतर महायाजकाने त्यांना पुन्हा विचारले, "धन्यवादित परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस का?"
62 "मी आहे," येशूंनी उत्तर दिले, "आणि तुम्ही मानवपुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशातून मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहाल."