येशू बारा प्रेषितांची निवड करतात
13 येशू डोंगरावर गेले आणि त्यांना ज्यांची गरज होती त्यांना स्वतःकडे बोलाविले आणि ते त्यांच्याकडे आले. 14 तेव्हा त्यांनी बारा जणांची3:14 काही मूळ प्रतींमध्ये 12 प्रेषित असे संबोधिले आहे. निवड केली, यासाठी की त्यांनी त्यांच्याबरोबर असावे आणि प्रचार करण्यासाठी बाहेर पाठविता यावे 15 आणि त्यांना भुते काढण्याचा अधिकार द्यावा.