38 येशू नावेच्या मागच्या भागास उशी घेऊन झोपी गेले होते. तेव्हा शिष्य त्यांना जागे करून म्हणाले, "गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत, याची तुम्हाला काळजी नाही काय?"
39 मग ते उठले आणि त्यांनी वार्याला धमकाविले व लाटांना, "शांत हो" असे म्हटले! तेव्हा ताबडतोब वादळ शमले आणि सर्व शांत झाले.
40 त्यांनी शिष्यांना विचारले, "तुम्ही इतके का घाबरला? तुम्हाला अद्यापही विश्वास नाही का?"