येशू भूतग्रस्त मनुष्यास बरे करतात
1 ते सरोवराच्या पलीकडे गरसेकरांच्या5:1 काही प्रतींमध्ये गदारेनेस दुसर्या प्रतींमध्ये गरगेसेनेस प्रांतात आले. 2 येशू होडीतून उतरले, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरस्तानातून धावत बाहेर आला. 3 हा मनुष्य स्मशानभूमीत राहत होता आणि त्याला बांधून ठेवणे अशक्य होते, साखळदंडाने बांधणेही शक्य नव्हते. 4 बरेचदा त्याचे हात व पाय साखळदंडाने बांधले असतानाही त्याने साखळदंड तोडून टाकले व पायातील लोखंडाच्या बेड्यांचे तुकडे केले. त्याला ताब्यात ठेवण्याची ताकद कोणातही नव्हती. 5 दिवस आणि रात्र तो स्वतःला दगडांनी ठेचून घेई व थडग्यामध्ये आणि डोंगरामधून मोठमोठ्याने ओरडत असे.
6 येशूंना त्याने दूर अंतरावरून पाहिले व तो धावत आला आणि त्यांच्यासमोर गुडघे टेकून पाया पडला, 7 तो मोठ्याने ओरडून म्हणाला, "हे येशू, परात्पर परमेश्वराच्या पुत्रा, तुला माझ्याशी काय काम? परमेश्वराची शपथ मला छळू नकोस." 8 कारण येशूंनी त्याला म्हटले होते, "अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून बाहेर ये."
9 "तुझे नाव काय?" येशूंनी विचारले,
त्याने उत्तर दिले, "माझे नाव लेगियोन5:9 लेगियोन अर्थात् सैन्य आहे, कारण आम्ही पुष्कळजण आहोत. 10 आम्हाला या प्रांतातून घालवून देऊ नकोस," अशी त्यांनी येशूंना पुन्हा विनंती केली.
11 त्याचवेळी डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. 12 "आम्हाला त्या डुकरांमध्ये जाण्याची परवानगी दे." अशी भुतांनी येशूंना विनंती केली. 13 येशूंनी त्यांना तशी परवानगी दिली, लगेच अशुद्ध आत्मे त्या मनुष्यातून बाहेर निघाले आणि डुकरांमध्ये शिरले व त्या दोन हजार डुकरांचा कळप डोंगराच्या उतरंडी वरून धावत सुटला आणि सरोवराच्या पाण्यात पडला व बुडाला.
14 डुकरांचे कळप राखणारे जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात जाऊन ही घटना सांगितली, काय घडले हे पाहावे म्हणून लोक बाहेर आले.