11 परंतु तुम्ही म्हणता, जर कोणी असे घोषित करतो की, आईवडिलांना करत असलेली मदत, ही ‘परमेश्वराला समर्पित’ आहे ते अर्पण आहे— 12 त्यामुळे तुम्ही त्यांना आईवडिलांसाठी काहीही करण्यास मनाई करता. 13 या ज्या तुमच्या परंपरा पूर्वजांपासून चालत आलेल्या आहेत, त्यासाठी तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता आणि अशा प्रकारच्या पुष्कळच गोष्टी तुम्ही करता."
14 येशूने परत गर्दीतील लोकांना आपल्याकडे बोलाविले आणि म्हटले, "तुम्ही माझे ऐका आणि हे समजून घ्या. 15 अशी कोणतीच गोष्ट नाही की जी बाहेरून मनुष्यामध्ये प्रवेश करून त्याला अशुद्ध करू शकेल.