36 मग त्यांनी एका लहान लेकराला त्यांच्यामध्ये ठेवले. मग त्या लेकराला कवेत उचलून घेत त्यांना म्हणाले, 37 "जो कोणी माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो माझा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याचा स्वीकार करतो."