3 येशूंनी उत्तर दिले, "तुमच्या प्रथा पाळण्याकरिता तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा का मोडता? 4 परमेश्वर म्हणाले, ‘तुझ्या वडिलांचा आणि आईचा सन्मान करा’15:4 निर्ग 20:12; अनु 5:16 आणि ‘जो कोणी आपल्या आई किंवा वडिलास शाप देईल त्यास जिवे मारावे.’15:4 निर्ग 21:17; लेवी 20:9