स्वर्गाच्या राज्यात सर्वश्रेष्ठ
1 त्याच सुमारास शिष्य येशूंकडे आले आणि त्यांना विचारले, "स्वर्गाच्या राज्यात सर्वात श्रेष्ठ कोण आहे?"
2 तेव्हा येशूंनी एका लहान लेकराला जवळ बोलाविले आणि त्या लेकराला त्यांच्यामध्ये उभे केले. 3 मग येशू त्यांना म्हणाले, "मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, जोपर्यंत तुमच्यात बदल होऊन तुम्ही लहान बालकासारखे होत नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यात कधीही तुमचा प्रवेश होणार नाही. 4 म्हणून जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वश्रेष्ठ होईल.