Pular para o conteúdo
Publicidade

मत्तय 18:15-17

OMRCV Marathi Contemporary Version

मंडळीत पाप करणार्‍याबरोबर कसे वर्तन करावे

15 "तुझ्या भावाने किंवा बहिणीने पाप18:15 काही मूळ प्रतींमध्ये तुझ्याविरुद्ध पाप केले तर केले असेल, तर त्याची चूक त्याला समजावून सांग, परंतु हे तुमच्या दोघांमध्ये असू दे. त्यांनी तुझे ऐकले, तर तू त्यांना परत मिळविले आहेस. 16 जर त्यांनी ऐकले नाही तर, एक किंवा दोन साक्षीदारांना बरोबर घेऊन जा, म्हणजे ‘दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित होईल.’18:16 अनु 19:15 17 यावरही ते तुझे ऐकण्यास तयार झाले नाही, तर तुझा दावा मंडळीकडे घेऊन जा आणि मंडळीचेही ऐकण्याचे त्यांनी नाकारले, तर तो एखादा गैरयहूदी किंवा जकातदार आहे असे समजून तू त्याच्याशी वाग.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    15 जर तुझा भाऊ तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्यास तुझ्यावर काय अन्याय झाला ते एकांतात सांग. जर त्यांने तुझे ऐकले तर त्यास आपला बंधू म्हणून परत मिळवला आहेस. 16 पण जर तो किंवा ती तुझे ऐकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्याबरोबर घे, यासाठी की जे काही झाले त्याविषयी साक्ष द्यायला दोन किंवा तीन जण तेथे असतील, 17 जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीलाही गोष्ट कळव. जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकणार नाही, तर मग तो तुला परराष्ट्रीय किंवा एखाद्या जकातदारासारखा समज.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.