खगोल शास्त्रज्ञांची ख्रिस्ताशी भेट
1 येशूंचा जन्म हेरोद राजाच्या कारकिर्दीत, यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नावाच्या गावी झाल्यानंतर, पूर्वेकडून खगोलशास्त्रज्ञ2:1 खगोलशास्त्रज्ञ किंवा ज्ञानी लोक यरुशलेमात आले. 2 ते विचारू लागले, "ज्यांचा जन्म झाला आहे ते यहूद्यांचे राजे कुठे आहेत? आम्ही त्यांचा तारा पाहिला आणि त्यांची उपासना करावयास आलो आहोत."