18 "आपण यरुशलेमात जात आहोत आणि तिथे मानवपुत्राला महायाजक व नियमशास्त्र शिक्षक यांच्या हवाली करण्यात येईल. ते त्याच्यावर आरोप करून त्याला मृत्युदंड देतील आणि नंतर त्याला गैरयहूदीयांच्या हाती सोपवून देण्यात येईल. 19 ते लोक त्याची थट्टा करतील, त्याला फटके मारतील व क्रूसावर खिळतील; परंतु तीन दिवसानंतर तो मरणातून पुन्हा उठेल."
Publicidade
Publicidade