17 तर आता आम्हाला हे सांगा की, कैसराला कर22:17 हा कर रोमी राज्यातील लोकांसाठी होता, रोमी नागरीकांसाठी नव्हता. देणे योग्य आहे की नाही?"
18 पण त्यांचा हेतू काय आहे हे येशूंनी ओळखले. "अहो, ढोंग्यांनो," येशू म्हणाले, "मला सापळ्यात पाडू पाहता काय? 19 कर भरण्यासाठी वापरलेले एक नाणे मला दाखवा." आणि त्यांनी त्यांना दिनारचे एक नाणे दाखविले. 20 येशूंनी त्यांना विचारले, "या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचा लेख आहे?"
21 "कैसराचे!" त्यांनी उत्तर दिले.
"मग," येशू म्हणाले, "जे कैसराचे आहे, ते कैसराला द्या आणि जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या."