युगाच्या समाप्तीची चिन्हे व मंदिराचा नाश
1 येशू मंदिरातून बाहेर पडले व चालत असता त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि त्यांचे लक्ष मंदिराच्या इमारतींकडे वेधले. 2 येशू त्यांना म्हणाले, "हे सर्व तुम्ही आता पाहत आहात ना? मी तुम्हाला खचित सांगतो की, एका दगडावर दुसरा दगड राहणार नाही. प्रत्येक दगड खाली पडेल."