मेंढरे आणि शेळ्या
31 "जेव्हा मानवपुत्र सर्व देवदूतांना बरोबर वैभवाने येईल, त्यावेळी तो वैभवशाली सिंहासनावर बसेल. 32 मग सर्व राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र होतील आणि मेंढपाळ मेंढरे व शेरडे वेगळे करतो तसा तो लोकांना एकमेकांपासून वेगळे करेल. 33 मेंढरांना तो त्याच्या उजवीकडे आणि शेरड्यांना त्याच्या डावीकडे करेल.