38 ते त्यांना म्हणाले, "मरणप्राय दुःखाने माझा आत्मा विव्हळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि माझ्याबरोबर जागे राहा."
39 मग थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडून त्यांनी प्रार्थना केली, "हे माझ्या पित्या, शक्य असल्यास हा प्याला माझ्यापासून दूर करा. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुमच्या इच्छेप्रमाणे होवो."