33 मग ते गोलगोथा या नावाने ओळखल्या जाणार्या जागी आले. गोलगोथाचा अर्थ "कवटीची जागा". 34 त्या ठिकाणी त्यांना पित्त मिसळलेला द्राक्षारस प्यावयास दिला. परंतु त्यांनी तो चाखून पाहिल्यावर घेतला नाही. 35 येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर त्यांची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली.