Pular para o conteúdo
Publicidade

मत्तय 6:19-24

OMRCV Marathi Contemporary Version

खरी संपत्ती

19 "तुमची धनसंपत्ती तुम्ही पृथ्वीवर साठवून ठेवू नका, कारण तिथे तिला कसर लागून, गंजून तिचा नाश होतो. शिवाय चोरही ती लुटून नेतात. 20 पण तुमची धनसंपत्ती स्वतःसाठी स्वर्गामध्ये साठवून ठेवा. कारण तिथे तिला कसर लागत नाही व ती गंजून जात नाही, तिचा नाश होत नाही आणि चोरही ती लुटून नेत नाहीत. 21 कारण जिथे तुमची संपत्ती आहे, तिथे तुमचे मनही असेल.

22 "डोळा शरीराचा दिवा आहे. तुझे डोळे निर्दोष6:22 किंवा उदार असले, तर सर्व शरीरही प्रकाशमय होईल. 23 पण तुमचे डोळे दोषपूर्ण6:23 किंवा कंजूष असले, तर तुमचे संपूर्ण शरीर अंधाराने भरून जाईल. म्हणून तुमच्यातील प्रकाशच जर अंधार असला, तर तो अंधार केवढा मोठा!

24 "कोणी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. तुम्ही एकाचा द्वेष कराल आणि दुसर्‍यावर प्रीती कराल किंवा एकाला समर्पित असाल आणि दुसर्‍याला तुच्छ मानाल. तुम्हाला परमेश्वराची आणि धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    19 तुम्ही पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका कारण येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. 20 म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. 21 जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.

    22 डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे निर्दोष असतील तर तुमचे संपुर्ण शरीर प्रकाशमय होईल. 23 पण जर तुमचे डोळे सदोष असतील, तर तुमचे संपुर्ण शरीर अंधकारमय होईल. जर तुम्हाठायी असणारा प्रकाश हा वास्तविक अंधकार आहे, तर खरोखरचा अंधार किती असणार! 24 कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्यावर प्रीती करील किंवा तो एका धन्याशी एकनिष्ठ राहील व दुसऱ्याला तुच्छ लेखेल. तसेच तुम्हास देवाची आणि पैशाचीधनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.