Pular para o conteúdo
Publicidade

मत्तय 6:5,6

OMRCV Marathi Contemporary Version

प्रार्थना

5 "तुम्ही प्रार्थना करताना ढोंग्यासारखे होऊ नका, रस्त्यांच्या कोपर्‍यात किंवा सभागृहांमध्ये उभे राहून, दुसर्‍यांना दिसावे म्हणून प्रार्थना करण्यास त्यांना आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. 6 तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा आपल्या खोलीत जा, दार बंद करा आणि मग तुमच्या अदृश्य पित्याची प्रार्थना करा. तुम्ही गुप्त प्रकारे केलेली प्रार्थना तुमचा पिता ऐकेल, तेव्हा ते तुम्हाला प्रतिफळ देतील.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    5 जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका कारण आपण लोकांस दिसावे म्हणून ते सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हास खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ प्राप्त झाले आहे. 6 पण तू जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आतल्या खोलीत जावून दरवाजा लावून घे व जो तुझा पिता गुप्तवासी आहे त्याची प्रार्थना कर. मग तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे तो तुला प्रतिफळ देईल.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.