इतरांचा न्याय करणे
1 "इतरांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. 2 कारण ज्या पद्धतीने तुम्ही इतरांचा न्याय कराल, त्याच पद्धतीने तुमचाही न्याय करण्यात येईल, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.
3 "आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न आणता तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? 4 सर्व वेळ स्वतःच्या डोळ्यामध्ये मुसळ असताना, ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे’ असे तू आपल्या भावाला कसे म्हणू शकतोस? 5 अरे ढोंगी माणसा! पहिल्याने तू आपल्या डोळ्यातील मुसळ काढ, मग तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्ट दिसेल.