Pular para o conteúdo
Publicidade

नहूम 3:8-10

OMRCV Marathi Contemporary Version

8 नाईल नदीकाठी वसलेल्या,

सर्व बाजूंनी पाण्याने घेरलेल्या

थेबेस नगरीपेक्षा तू अधिक चांगली आहेस काय?

नदीच तिला संरक्षण देते,

नदीच तिची तटबंदी आहे.

9 कूश3:9 नाईल नदीचा वरचा भाग आणि इजिप्त तिचे अपरिमित सामर्थ्य होते;

पूट व लिबिया तिच्या मित्रराष्ट्रांपैकी होते.

10 असे असूनही थीब्जचा पाडाव झाला

आणि तिला बंदिवासात नेण्यात आले.

तिची बालके रस्त्यांच्या प्रत्येक कोपऱ्यावर

दगडांवर आपटून ठार मारण्यात आली.

तिच्या अधिकार्‍यांसाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या,

तिच्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना साखळदंडानी बांधण्यात आले.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    8 निनवे तू थेबेसनो-आमोन , जी नील नदीच्यावर बांधली आहे, तिचे सभोवती पाणी होते, महासमुद्र तिचा संरक्षण होता, समुद्र स्वतः तिचा कोट होता तिच्यापेक्षा उत्तम आहेस काय? 9 कूशी व मिसरी यांचे तिला बल होते व ते अमर्याद होते; पूटी व लुबी यांची तिला मदत होती.

    10 तरी थेबेसला पाडाव करून नेण्यात आले, ती बंदीवासात गेली तिची तरुण मुले प्रत्येक मुख्य रस्त्यात आपटून तुकडे करून मारण्यात आली. तिच्या शत्रूंनी प्रतिष्ठीत मनुष्यांवर चिठ्ठ्या टाकल्या आणि त्यांनी तिच्या सर्व महान मनुष्यांना साखळ्यांनी बांधून नेले.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.

Naum
Ver todos os capítulos de Naum