16 शुभवार्तेची मला लाज वाटत नाही, कारण त्यावर विश्वास ठेवणार्या प्रत्येकाचे, प्रथम यहूदीयांचे नंतर गैरयहूदीयांचे तारण करण्यास ती परमेश्वराचे सामर्थ्य आहे. 17 या शुभवार्तेमध्ये परमेश्वराचे नीतिमत्व प्रकट होते व हे नीतिमत्व विश्वासाने प्रथमपासून शेवटपर्यंत विश्वासाद्वारे1:17 किंवा विश्वासापासून विश्वासाकडे साध्य होते, कारण असे लिहिले आहे, "नीतिमान विश्वासाने जगेल."1:17 हब 2:4
Publicidade