परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे
33 अहाहा, परमेश्वराचे गहन ज्ञान आणि बुद्धीची संपत्ती किती अगम्य आहे!
त्यांचे न्याय गहन आहेत,
त्यांचे मार्ग किती दुर्गम आहेत!
34 "कारण प्रभूचे मन कोण जाणू शकेल?
किंवा त्यांचा सल्लागार कोण आहे?"11:34 यश 40:13
35 "परमेश्वराला कोणी कधी काही दिले
की परमेश्वराने त्यांची परतफेड करावी?"11:35 इय्योब 41:11
36 कारण त्यांच्यापासून आणि त्यांच्याद्वारे आणि त्यांच्यासाठी सर्वगोष्टी आहेत.
त्यांना सदासर्वकाळ गौरव असो! आमेन.