Pular para o conteúdo
Publicidade

रोमकरांस 12:17-21

OMRCV Marathi Contemporary Version

17 वाईटाने वाईटाची फेड करू नका. सर्वांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करा. 18 साधेल तर, तुम्हाकडून होईल तितके प्रत्येकाशी शांतीने राहा. 19 माझ्या प्रिय मित्रांनो, सूड उगवू नका. तर परमेश्वराच्या क्रोधाला वाट द्या, असे लिहिले आहे: "सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन,"12:19 अनु 32:35 असे प्रभू म्हणतात. 20 त्याउलट:

"तुमचा शत्रू भुकेला असेल, तर त्याला खावयास द्या;

तो तान्हेला असेल, तर त्याला प्यावयास द्या.

असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्‍यांची रास कराल."12:20 नीती 25:21, 22

21 वाईटाने जिंकले जाऊ नका, तर चांगल्याने वाईटाला जिंका.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    17 वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा. 18 शक्य असल्यास सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने रहा. 19 प्रियांनो, तुम्ही स्वतः सूड घेऊ नका, पण क्रोधाला वाव द्या कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे परमेश्वर म्हणतो.’

    20 पण तुझा वैरी भुकेला असेल तर त्यास खायला दे;

    तो तान्हेला असेल तर त्यास प्यायला दे;

    कारण असे करण्यात तू त्याच्या डोक्यावर विस्तवातल्या इंगळांची रास करशील.

    21 वाईटाने जिंकला जाऊ नकोस; पण बऱ्याने वाईटाला जिंक.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.