परमेश्वराचा नीतिपर न्यायनिवाडा
1 जे तुम्ही दुसर्यांना दोष लावता, एखाद्या विषयाला धरून दुसर्यांचा न्याय करता, त्यावेळी तुम्ही स्वतः दोषी ठरता; कारण तुम्ही जे न्याय करणारे आहात, ते स्वतःच त्या गोष्टी करता. यामुळे, तुम्हाला कोणतीच सबब सांगता येणार नाही. 2 आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्यांविरूद्ध परमेश्वराचा न्याय सत्यावर आधारलेला आहे. 3 तुम्ही सर्वसाधारण मनुष्य असून न्याय करता, पण तीच कृत्ये स्वतः करता तर, तुम्ही परमेश्वराच्या न्यायातून सुटाल असे तुम्हाला वाटते का?