आत्म्याद्वारे जीवन
1 यास्तव, जे आता ख्रिस्त येशूंमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही. 2 कारण ख्रिस्त येशूंच्याद्वारे आत्म्याच्या नियमाने जे तुम्हाला जीवन देतात, त्यांनी तुम्हाला पापाचे नियम व मरण यातून मुक्त केले आहे. 3 कारण आपल्या पापी स्वभावामुळे आपल्याला वाचविण्यास नियम असमर्थ होते, तेव्हा परमेश्वराने स्वतःच्या पुत्राला पापमय मनुष्यासारखे व पापबली म्हणून पाठविले व मानवी स्वभावात जे पाप राज्य करीत होते त्याला दोषी ठरविले. 4 यासाठी की जे देहाने नव्हे तर पवित्र आत्म्याप्रमाणे जीवन जगतात, त्यांच्यामध्ये नियमांसाठी आवश्यक असणारे नीतिमत्व पूर्ण व्हावे.