नाओमीला पुत्रप्राप्ती होते
13 तेव्हा बवाजने रूथला स्वीकारले आणि ती त्याची पत्नी झाली. जेव्हा त्याने तिच्याशी प्रीतिसंबंध केले, तेव्हा याहवेहनी तिला गर्भ राहण्यासाठी समर्थ केले, आणि तिने मुलाला जन्म दिला. 14 तेव्हा स्त्रिया नाओमीला म्हणाल्या: "याहवेहची स्तुती असो, ज्यांनी या दिवशी तुझी जबाबदारी घेऊन सोडविणाऱ्याशिवाय तुला सोडले नाही. तो संपूर्ण इस्राएलमध्ये प्रसिद्ध होवो! 15 तो तुला नवजीवन देऊन तुझ्या वृद्धापकाळात तुला आधार देईल. कारण तुझी सून, जी तुझ्यावर प्रीती करते आणि जी सात मुलांपेक्षा अधिक उत्तम आहे, तिनेच त्याला जन्म दिला आहे."
16 तेव्हा नाओमीने ते बाळ उचलून उराशी धरले आणि त्याची काळजी घेऊ लागली. 17 तिथे राहणाऱ्या स्त्रिया म्हणाल्या, "आता नाओमीला मुलगा आहे!" आणि त्यांनी त्याचे नाव ओबेद ठेवले. जो इशायाचा पिता, जो दावीद राजाचा पिता होता.
दावीदाची वंशावळ
18 पेरेसाची वंशावळ अशी:
पेरेस हा हेस्रोनचा पिता होता,
19 हेस्रोन हा रामचा पिता,
राम हा अम्मीनादाबचा पिता,
20 अम्मीनादाब हा नहशोनचा पिता,
नहशोन हा सल्मोन4:20 काही मूळ प्रतींनुसार सल्मा चा पिता,
21 सल्मोन हा बवाजचा पिता,
बवाज हा ओबेदचा पिता,
22 ओबेद हा इशायचा पिता,
आणि इशाय हा दावीदाचा पिता.