Pular para o conteúdo
Publicidade

याकोब 2:14,17,18,24,26

OMRCV Marathi Contemporary Version

विश्वास आणि कर्मे

14 माझ्या बंधू आणि भगिनींनो, जर कोणी असा दावा करतो की त्याच्याजवळ विश्वास आहे, परंतु क्रिया नाही तर त्यापासून काय लाभ? अशा विश्वासाने त्यांचे तारण होऊ शकेल का? 17 त्याचप्रमाणे, विश्वासाला जर कृतीची जोड नसली तर तो निर्जीव आहे.

18 पण कोणी म्हणेल, "तुझ्याजवळ विश्वास आहे; आणि माझ्याकडे क्रिया आहे."

तुझा विश्वास क्रियांवाचून मला दाखव आणि मी माझा विश्वास माझ्या कृत्यांद्वारे सिद्ध करतो.

24 तर मग तुम्ही पाहा मनुष्य केवळ विश्वासाने नव्हे तर कृतीने नीतिमान ठरतो.

26 जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    14 माझ्या बंधूंनो, कोणी मनुष्य म्हणत असेल की "माझ्याजवळ विश्वास आहे"; पण त्याच्याजवळ जर कृती नाही, तर त्यास काय लाभ? विश्वास त्यास तारू शकेल काय? 17 म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे. 18 आता, कोणी मनुष्य म्हणेल की, "तुझ्याजवळ विश्वास आहे आणि माझ्याजवळ कृती आहेत." तुझ्या कृतींशिवाय तुझा विश्वास मला दाखव आणि मी माझ्या कृतीवरून माझा विश्वास तुला दाखवीन. 24 तर तुम्ही हे पाहता की, कोणी मनुष्य केवळ विश्वासाने नाही, पण कृतीनी नीतिमान ठरतो. 26 कारण ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर निर्जीव आहे त्याचप्रमाणे कृतीशिवाय विश्वास निर्जीव आहे.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.