15 समजा तुमच्या बंधू किंवा भगिनीला वस्त्र आणि रोजच्या अन्नाची उणीव आहे. 16 जर तुमच्यापैकी एकजण त्यांना म्हणतो, "शांतीने जा; ऊब घ्या व खाऊन तृप्त व्हा," परंतु त्यांच्या शारीरिक गरजासंबंधी काही करीत नाही, तर काय उपयोग? 17 त्याचप्रमाणे, विश्वासाला जर कृतीची जोड नसली तर तो निर्जीव आहे.