Pular para o conteúdo
Publicidade

तीता 2

शुभवार्तेसाठी चांगले कार्य

1 शुद्ध शिक्षणास जे धरून आहे तेच तू शिकव. 2 वयस्क पुरुषांनी नेमस्त, आदरास पात्र, आत्मसंयमी व विश्वास, प्रीती आणि सहनशीलता यामध्ये खंबीर असावे, असे शिक्षण तू त्यांना दे.

3 त्याचप्रमाणे वयस्क स्त्रिया आदरयुक्त असाव्या; त्या इतरांच्या चहाड्या करीत फिरणार्‍या किंवा मद्यपानासक्त नसाव्या; त्या सुशिक्षण देणार्‍या असाव्या; 4 म्हणजे त्या तरुण स्त्रियांस त्यांच्या पतींवर आणि मुलांवर प्रीती करण्यास, 5 आत्मसंयमी, शुद्धाचरणी, घरकामात मग्न, मायाळू व आपल्या पतींच्या अधीन राहण्यास शिकविता येईल, म्हणजे परमेश्वराच्या वचनाची निंदा होणार नाही.

6 तसेच, तरुणांनी आत्मसंयमी व्हावे, म्हणून त्यांना प्रोत्साहित कर. 7 जे चांगले ते करून, तू त्यांना प्रत्येक गोष्टींत कित्ता घालून दे. तुझ्या शिकविण्यात प्रामाणिकपणा, गांभीर्य दाखव. 8 दोष लावता येणार नाही अशा सद्भाषणाने युक्त तुझी शिकवण असावी; यासाठी की जे तुला विरोध करतील, त्यांना आपल्याविषयी वाईट बोलण्यास जागाच नसल्यामुळे लाज वाटावी.

9 दासांना असा बोध कर की त्यांनी त्यांच्या धन्याच्या अधीन असावे, त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा, त्यांना उलट उत्तर देऊ नये; 10 आणि त्यांनी चोरी करू नये, तर त्यांच्यावर भरवसा ठेवण्यास ते लायक आहेत असे दाखवावे. यासाठी की या सर्व गोष्टींत त्यांनी आपल्या तारणार्‍या परमेश्वराबद्दलच्या शिक्षणास शोभा आणावी.

11 कारण आता सर्वांना तारण देणारी परमेश्वराची कृपा प्रकट झाली आहे. 12 ती कृपा आपल्याला असे शिकविते की, आम्ही अभक्ती व ऐहिक वासनांना "नाही" म्हणून, आताच्या युगात आत्मसंयमाने, नीतीने व सुभक्तीने जगावे; 13 आणि धन्य आशेची, म्हणजे येशू ख्रिस्त आपले महान परमेश्वर आणि तारणाऱ्यांचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहावी. 14 त्यांनीच स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला प्रत्येक अधर्मापासून मुक्त केले, त्यांनी स्वतःसाठी शुद्ध करून त्यांच्या चांगल्या कार्यासाठी आपल्याला उत्साही प्रजा बनविले.

15 अधिकाराने या सर्व विषयांचे शिक्षण देऊन लोकांना बोध आणि प्रोत्साहित कर. यात कोणीही तुला तुच्छ मानू नये.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.

Tito
Ver todos os capítulos de Tito