11 कारण आता सर्वांना तारण देणारी परमेश्वराची कृपा प्रकट झाली आहे. 12 ती कृपा आपल्याला असे शिकविते की, आम्ही अभक्ती व ऐहिक वासनांना "नाही" म्हणून, आताच्या युगात आत्मसंयमाने, नीतीने व सुभक्तीने जगावे; 13 आणि धन्य आशेची, म्हणजे येशू ख्रिस्त आपले महान परमेश्वर आणि तारणाऱ्यांचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहावी.