10 "अगे सीयोनकन्ये, गीत गा आणि उल्हास कर! कारण मी येत आहे आणि मी तुम्हामध्ये वस्ती करेन," याहवेह जाहीर करतात. 11 "त्या दिवसात अनेक राष्ट्रे याहवेहकडे वळतील. मी तुम्हामध्ये वस्ती करेन मग तुम्हाला कळेल की सर्वसमर्थ याहवेहने मला पाठविले आहे. 12 आणि यहूदीया ही पवित्र भूमी याहवेहचे वतन होईल, आणि ते पुन्हा यरुशलेमला निवडतील.
Publicidade