10 वांकी इल्ला दृष्टांत आयनेंका आ मंदीक सुवार्ता शपदेंक द्यावार मंमलान कुतेशिनाड इल्ला अनुमान शेशी मिम मासेदोनीयाला फोयेदेंक लगेच विचार शेस्तीम.
पौल मासेदोनीया लोंदी फिलीप्पिक फोताळ
11 आप्पुड त्रोवसाकेल जहाज ला कुसनी मिम शिंगार समथ्राकेस बेटकी फोतीम इंगा दुसरा नाळ नियापुलीस शहरकी फोतीम. 12 आंदकेल फिलीप्पी शहरकी फोतीम; आदी मासेदोनियालोन इ भागलोंदी पहिलादे नगर उंडी आंदू रोमन मंदीद वसाहत उंडाद आ नगरला मिम तोडेम नाळ नीलस्तिम. 13 मग शब्बाथ नाड मिम वेशी बेटीक वंका कंटामकी, यंदू प्रार्थना आतूनटाद इल्ला माक वाटाश्या आंदू फोई कुसुंटीम; इंगा या आंडेर आंदू जमा आयनीर वार संगा माटलाड देंक आंटतीम. 14 आंदू लुदिया फेरूद यादो ओगा आंडीद उंड्या; आदी थुवतीरा नगरदी उंडी जांभळाय बटाल आंमदु; आदी द्यावार्दी उपासना शेशेद उंड्या, आदी माद भाषण ऐकाश्या; दांदी अंतकरण प्रभूड इल्ला तयार शेशाकी पौल शप्काम तीकुड आदी लक्ष्य इच्या. 15 मग दांदी इंगा दान घरानाद बाप्तिस्मा आयनेंका आदी इल्ला विनंती शेश्या की, "नीन प्रभून मिंदा विश्वास फेटेदान उंडान इल्ला जर मीर मानास्तुनार तर ना ईलकाडा वची निलूना." दान आग्रह इचांग आदी विनंती माक मान्य शेय्या बेक आय्या.
पौल इंगा सिला न जेलला
16 मग इल्ला आय्या की, मिम प्रार्थना जागा तीकुड फोयेताप्पुड येवात तरी ओगा दृष्ट आत्मा आंटीनेद आन्बीडा माक कमशा, दान फईला वच्चू, आदी भविष शपी दान धन्यालकी संगेम दुडलु कमाशी इच्चू. 17 आदी पौल इंगा मा यंका वची बेग्गे आन्या, "इ मंदी परात्पर द्यावार दास उंडार, इर मनाक तारणदी दावा शेप्तार."