Adoração
A adoração é a resposta do coração humano à majestade de Deus. Deus é Espírito e importa que os que o adoram o adorem em espírito e em verdade — com todo o ser.
Adorar em espírito
Deus é Espírito e importa que os adoradores o adorem em espírito e em verdade. A adoração verdadeira brota do coração.
देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे."
तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने स्वर्गीय पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असेच असावेत, अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे."
येशू तिला म्हणाला, "मुली, माझ्यावर विश्वास ठेव की अशी घटका येत आहे; तुम्ही या डोंगरावर किव्हा यरूशलेम शहरात पित्याची उपासना करणार नाही, तुम्ही ज्याला ओळखीत नाही अशाची उपासना करता; आम्हास ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहूद्यांतूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने स्वर्गीय पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असेच असावेत, अशी पित्याची इच्छा आहे.
तो म्हणाला, "प्रभूजी, मी विश्वास ठेवतो." आणि त्याने त्यास नमन केले.
येशूंनी त्यास म्हटले, "अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर
आणि त्यालाच नमन कर.’"
येशूने उत्तर दिले, "पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे. प्रभू तुझा देव याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर."
नवीन जिवितक्रम
म्हणून बंधूंनो देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय’ यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
नवीन जिवितक्रम
म्हणून बंधूंनो देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय’ यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि या जगाशी समरूप होऊ नका पण तुमच्या मनाच्या नवीनीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी.
कारण सर्व गोष्टी त्याच्याकडून, त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी आहेत; त्यास युगानुयुग गौरव असो. आमेन.
कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील,
आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’
Louvor e reverência
Vinde, adoremos e prostremo-nos. Louvai ao Senhor! Todo ser que respira louve o nome glorioso do Senhor.
याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू,
त्याची उपासना करू, त्यास नमन करू;
याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू,
त्याची उपासना करू, त्यास नमन करू;
परमेश्वराचे स्तवन करा
परमेश्वराची स्तुती करा.
देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा.
त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा.
त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा;
त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा.
शिंग वाजवून त्याची स्तुती करा;
सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा.
डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा;
तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा.
जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा;
उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा.
प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो.
परमेश्वराची स्तुती करा.
प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो.
परमेश्वराची स्तुती करा.
त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात,
आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा.
त्याचे उपकारस्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
परमेश्वरास त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या;
पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
देवाच्या महत्कृत्यांबद्दल उपकारस्तुती
अहो पृथ्वीवरील सर्वजणहो देवाचा जयजयकार करा;
त्याच्या नावाचा महिमा गा;
त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा.
देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भीतिदायक आहेत,
तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन होतात.
सर्व पृथ्वी तुझी आराधना करतील;
आणि तुझी स्तोत्रे गातील;
ते तुझ्या नावाची स्तोत्रे गातील.
मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला,
आणि माझ्या जीभेवर त्याची स्तुती होती.
हे प्रभू, तू निर्माण केलेली सर्व राष्ट्रे येतील आणि तुझ्यापुढे नमन करतील.
ते तुझ्या नावाला आदर देतील.
कारण तू महान आहेस व तू आश्चर्यकारक गोष्टी करतोस;
तूच फक्त देव आहेस.
देवाच्या उपकारांबद्दल धन्यवाद
हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर,
हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.
इस्त्राएलासाठी देवाने केलेला चमत्कार
परमेश्वरास धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा.
राष्ट्रांमध्ये त्याच्या कृत्यांची माहिती करून द्या.
देव तान्हेल्या जिवांचे समाधान करतो
हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन;
शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे;
माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे.
कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे;
माझे ओठ तुझी स्तुती करतील.
म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन;
मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन.
Declarações de adoração
Tu és digno, Senhor, de receber glória e honra! Ao Senhor pertence a grandeza, o poder, a glória e a majestade.
"हे प्रभू, आमच्या देवा,
तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस,
तू सर्व गोष्टी उत्पन्न केल्यास,
कारण तू सर्वकाही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि उत्पन्न केले."
तो मोठ्या आवाजात म्हणत होता, देवाचे भय धरा आणि त्यास गौरव करा; कारण न्यायाची वेळ आली आहे आणि ज्याने आकाश, पृथ्वी आणि समुद्र आणि पाण्याचे झरे हे उत्पन्न केले त्यास नमन करा.
हे प्रभू, तुला कोण भिणार नाही?
आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही?
कारण तू एकच पवित्र आहेस;
कारण सगळी राष्ट्रे येऊन
तुझ्यापुढे नमन करतील.
कारण तुझ्या नीतिमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.
ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या तो मनुष्य मी, योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवीत असलेल्या देवदूताच्या पायाशी नमन करण्यास मी पालथा पडलो. परंतु तो देवदूत मला म्हणाला, "असे करू नको. मी तुझ्याबरोबर आणि तुझे भाऊ संदेष्टे, जे या पुस्तकात नमूद केलेल्या वचनांचे पालन करतात, त्यांच्याबरोबर काम करणारा देवाचा एक दास आहे. देवाला नमन कर."
हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि वैभव ही सर्व तुझीच आहेत कारण आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते तुझेच आहे. हे परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे. या सगळ्याहून उच्च पदास पोहचलेला तूच आहेस.
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे.
कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
आणि म्हणा, "हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास तार.
आम्हास एकत्र करून इतर राष्ट्रापासून सोडीव.
आणि तुझ्या पवित्र नावाची उपकारस्तुती करावी
आणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे."
इस्राएलाचा देव परमेश्वर अनादी काळापासून अनंतकाळापर्यंत धन्यवादित असो.
सर्व लोकांनी "आमेन" म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे.
कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
त्याचे गायन करा, त्याचे स्तुतीगान करा.
त्याच्या सर्व आश्र्चर्यकारक कृत्यांविषयी बोला.
ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि हे देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जीभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
Sacrifício de louvor
Por meio de Jesus ofereçamos sempre sacrifício de louvor. Cantai ao Senhor, celebrai em salmos — enchei-vos do Espírito.
म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या "ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा."
म्हणून, आम्हास अढळ असे राज्य कृपेने देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञता बाळगू या आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची सेवा करू; कारण आपला "देव भस्म करणारा अग्नी आहे."
सर्व प्रकारची स्तोत्रे, गीते आणि आत्मिक गीतांनी त्याची स्तुती करा. एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गीत गा आणि आपल्या अंतःकरणाने परमेश्वराची स्तुती करा.
ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा.
मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते.
आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव तो धन्यवादित असो. तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.
आम्ही जे पाहिले व ऐकले आहे ते आम्ही आता तुम्हांलाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासोबत सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे.
Adoração como vida
Exaltai ao Senhor, prostrai-vos ante o escabelo dos seus pés. A adoração genuína transforma o adorador e agrada o Criador.
परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा
आणि त्याच्या पदासनाजवळ त्याची उपासना करा.
तो पवित्र आहे.
माझे मुख दिवसभर तुझ्या स्तुतीने
आणि सन्मानाने भरलेले असो.
देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा;
ज्याची स्वारी यार्देन नदीच्या खोऱ्यातील मैदानातून चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा;
त्याचे नाव परमेश्वर आहे; त्याच्यापुढे हर्षभरित व्हा.
तो पितृहीनाचा पिता, विधवांचा मदतगार
असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी राहतो.
मी परमेश्वरास त्याच्या न्यायीपणाप्रमाणे धन्यवाद देईन,
मी परात्पर परमेश्वराच्या नावाची स्तुती गाईन.
परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझे नाव सांगेन.
सभेत मी तुझे गुणगान गाईन.
जे लोक परमेश्वराचे भय धरतात, ते तुम्ही त्याची स्तुती करा!
याकोबाच्या सर्व वंशजांनो, त्यास मान द्या!
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.
मी प्रार्थनेत आपले हात तुझ्यापुढे पसरतो;
शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झाला आहे.
हे माझ्या जीवा तू का निराश झाला आहेस?
माझ्यामध्ये तू तळमळत आहेस?
देवाची आशा धर, कारण माझ्या मुखाचे तारण आणि
माझा देव त्याची अजून मी स्तुती करीन.
मी परमेश्वरास म्हणालो, "हे परमेश्वरा, तू माझा प्रभू आहेस, माझ्यामध्ये असलेला चांगुलपणा तुझ्याशिवाय काहीच नाही."
भय धरून परमेश्वराची स्तुती करा
आणि थरथर कापून हर्ष करा.
तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन,
हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन.
Falsa adoração
Não terás outros deuses diante de mim. Não adorarás ídolos. A adoração exclusiva ao Senhor é mandamento inegociável.
त्यांची सेवा करू नको; किंवा त्यांच्या पाया पडू नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव ईर्ष्यावान देव आहे. जे माझा विरोध करतात, त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो;
तू तर कोणत्याही दुसऱ्या देवाला नमन करू नये; कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान असे आहे; तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे.
जेव्हा मोशे मंडपात जाई तेव्हा मेघस्तंभ खाली उतरून येई आणि मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे. जेव्हा लोक दर्शनमंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत.
परमेश्वर माझे सामर्थ्य व माझे गीत आहे.
तो माझे तारण झाला आहे.
मी त्याची स्तुतीस्तोत्रे गाईन; परमेश्वर माझा देव आहे;
तो माझ्या पूर्वजांचा देव आहे; मी त्याचे गौरव करीन.
हे परमेश्वरा, देवांमध्ये तुजसमान कोण आहे?
पवित्रतेने ऐश्वर्यवान, स्तवनात भयानक,
अद्भुते करणारा असा तुजसमान कोण आहे?
तू आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावीस; म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल. मी तुमच्यामधून रोगराई दूर करीन.
फक्त परमेश्वराची स्तुती करा. तो तुमचा देव आहे. त्याने केलेले चमत्कार आणि भयानक थोर कृत्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिली आहेत.
आपल्या कुटुंबियासमवेत तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात तुम्ही तेथे भोजन करा. तुम्ही कष्ट करून जे मिळवलेत त्याच्या आनंदात तेथे तुम्ही सर्वजण सामील व्हा. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हास सर्व गोष्टी मनासारख्या मिळत आहेत याची आठवण ठेवा.
त्यांनी अन्य दैवतांची पूजा करायला सुरुवात केली आणि त्याची ईर्ष्या जागवली. मूर्ती त्यास मान्य नाहीत, तरी या लोकांनी मूर्ती केल्या व त्याचा कोप ओढवला. खरे देव नव्हेत अशा भुतांना त्यांनी यज्ञार्पणे केली. अपरिचित दैवतांची पूजा केली. आपल्या पूर्वजांना पूर्वी कधी माहीत नसलेल्या दैवतांची पूजा केली. आपल्या निर्माणकर्त्याच्या दुर्गाचा त्यांनी त्याग केला. जीवनदायी देवाला ते विसरले.
पण सांभाळा, गाफील राहू नका. या देवापासून परावृत होऊन इतर दैवतांचे भजन पूजन करु नका.
माझा प्रभू म्हणतो, हे लोक, माझ्यावर त्यांचे प्रेम आहे, असे म्हणतात ते शब्दांनी माझ्याबद्दलचा आदर व्यक्त करतात.
पण त्यांची मने माझ्यापासून फार दूर आहेत. त्यांचा माझ्याबद्दलचा आदर,
म्हणजे फक्त त्यांनी पाठ केलेले व मनुष्यांनी घालून दिलेले नियम आहेत.
परमेश्वराच्या उपकाराबद्दल स्तुतिगीत
हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस, मी तुला उंच करीन, मी तुझी स्तुती करीन.
कारण तू अद्भूत कृत्ये केली आहेस,
जे संकल्प तू पूर्वीच योजून ठेवले होते, ते तू आपल्या परिपूर्ण विश्वासाच्या द्वारे घडवून आणले आहेस,
तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील सेनागणाची पूजा करण्यास सोडून दिले; ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहीले आहे ‘हे इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केलेत काय?
मोलखाचा मंडप व रेफान दैवतांचा तारा म्हणजे पुजण्याकरता: तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या; मीही तुम्हास बाबेलच्या पलिकडे नेऊन ठेवीन.’
लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने व देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्वतःला दिसलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक मनाने विनाकारण गर्वांने फुगणाऱ्या कोणा मनुष्यास तुम्हास तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका; असा मनुष्य मस्तकाला धरून राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या द्वारे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची दैवी वाढ होते.
कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरूष, नाशाचा पुत्र प्रकट होईल; तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा उपासनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या भवनात बसणारा असा आहे.
Exemplos de adoração
Jó adorou em meio ao sofrimento. Esdras adorou na restauração. Paulo e Silas adoraram na prisão — e Deus respondeu.
तेव्हा ईयोबाने ऊठून, त्याचा झगा फाडला, त्याने डोक्याचे मुंडन केले, भूमीकडे तोंड करून पालथा पडला आणि देवाची उपासना केली. तो म्हणाला, "मी माझ्या मातेच्या ऊदरातून नग्न आलो, आणि पुन्हा तेथे नग्न जाईल. परमेश्वराने दिले, व परमेश्वराने नेले, परमेश्वराचे नाव धन्य असो."
"तो चांगला आहे! इस्राएलावर त्याची दया सर्वकाळ आहे." स्तुती आणि उपकार मानत अशी गीते त्यांनी गाईली. मंदिराचा पाया घातला गेला म्हणून त्यांनी परमेश्वराचा जयजयकार केला. त्यांनी मोठ्याने घोषणा दिल्या.
आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गीय राजास गौरव देवून त्याची खूप स्तुती करतो, कारण त्याची सर्व कामे सभ्यतेची आणि त्याचे मार्ग न्यायाचे आहेत. जे गर्वाने चालतात त्यास तो नम्र करतो.
ह्यास्तव हे माझ्या प्रभू, परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे, त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही.
परमेश्वरासारखा कोणी पवित्र नाही,
कारण तुझ्या शिवाय कोणी नाही,
आमच्या देवासारखा खडकही कोणी नाही,
मग येशूवा, बानी, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या आणि पथह्या हे लेवी म्हणाले, "उभे राहा आणि आपला परमेश्वर देव याचे स्तवन सदासर्वकाळ करा. लोक तुझ्या वैभवशाली नावाचे स्तवन करोत आणि तुझे नाम स्तुती आणि आशीर्वाद यांच्या पलीकडे उंचावले जावो.
जरी अंजिराच्या झाडांनी फळ दिले नाही आणि द्राक्षवेलींना काही उपज आले नाही,
जैतूनाच्या झाडाच्या उपजाने जरी निराशा झाली आणि शेतांतून अन्न उगवले नाही,
कळप वाड्यातून नाहीसे झाले असले, गोठ्यात गाई-गुरे उरली नसली,
तरी मी परमेश्वराठायी आनंद करीन, माझ्या तारणाऱ्या देवाजवळ उल्लास करीन.
मग तुम्ही माझा धावा कराल आणि जाऊन माझी प्रार्थना कराल आणि तेव्हा मी तुमचे ऐकेन.
तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुद्ध करा; अहो द्विमनाच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुद्ध करा.