Pular para o conteúdo
Publicidade

स्तोत्रसंहिता 42

देवप्राप्तीचा ध्यास

मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे मासकील. (शिक्षण)

1 जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते,

तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो.

2 माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला आहे.

मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन?

3 जेव्हा माझे शत्रू नेहमी मला म्हणतात की, "तुझा देव कोठे आहे?"

तेव्हा रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.

4 हर्षानादाने आणि स्तुती करत, सण साजरा करणाऱ्या पुष्कळांबरोबर,

कसा मी त्या गर्दीला नेतृत्व करत देवाच्या घरात घेऊन जात असे,

हे आठवून माझा जीव माझ्याठायी ओतला जात आहे.

5 हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस?

माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस?

देवाची आशा धर, कारण त्याच्या उपस्थितीने होणाऱ्या तारणामुळे

मी त्याची अजून स्तुती करीन.

6 माझ्या देवा, माझ्याठायी माझा जीव निराश झाला आहे,

म्हणून यार्देनच्या प्रदेशापासून,

हर्मोनच्या डोंगराच्या तीन शिखरावरून आणि मिसहारच्या टेकडीवरून मी तुझे स्मरण करतो.

7 तुझ्या धबधब्याच्या अवाजाने ओघ ओघाला हाक मारतो.

तुझ्या सर्व लहरी आणि मोठ्या लाटा माझ्यावरून गेल्या आहेत.

8 तरी परमेश्वर त्याची प्रेमदया दिवसा अज्ञापील,

आणि रात्री त्याचे गीत, म्हणजे माझ्या जीवाच्या देवाला केलेली प्रार्थना माझ्यासोबत असेल.

9 मी देवाला म्हणेल, माझ्या खडका, तू का मला सोडले आहे?

शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करू?

10 "तुझा देव कुठे आहे?" असे बोलून

माझे शत्रू तलवारीने माझ्या हाडात भोसकल्याप्रमाणे पूर्ण दिवस मला दोष देत राहतात.

11 हे माझ्या जीवा तू का निराश झाला आहेस?

माझ्यामध्ये तू तळमळत आहेस?

देवाची आशा धर, कारण माझ्या मुखाचे तारण आणि

माझा देव त्याची अजून मी स्तुती करीन.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.