Publicidade

Salmos 122

यरूशलेमेच्या कुशलासाठी प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र

1 आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते मला म्हणाले,

तेव्हा मला आनंद झाला.

2 हे यरूशलेमे,

तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत.

3 हे यरूशलेमे,

एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.

4 इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे,

तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश,

परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.

5 कारण तेथे न्यायासने,

दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.

6 यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा!

तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.

7 तुझ्या कोटात शांती असो,

आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.

8 माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता,

मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.

9 परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता,

मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_18-40-07-