Publicidade

Salmos 12

दुष्टाविरुद्ध साहाय्याची याचना
मुख्य गायकासाठी; शमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.

1 हे परमेश्वरा, साहाय्य कर! कारण भक्तिमान नाहीसा झाला आहे.

विश्वासू गायब झाला आहे.

2 प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो,

प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो.

3 परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको.

4 हे ते आहेत जे असे म्हणतात, "आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ,

जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?"

5 परंतु परमेश्वर म्हणतो, "गरिबांच्या विरोधात हिंसाचार केल्यामुळे, गरजवंतांच्या कण्हण्यामुळे, मी आता उठतो;

ज्या सुरक्षीतपणाची तो वाट पाहतो, ते मी त्यास देईन."

6 परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत,

पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत.

7 हे परमेश्वरा, तुच त्यांना सांभाळशील,

या पिढीपासून तू त्यांना सर्वकाळ राखशील.

8 मनुष्यांच्या संतानांमध्ये निचपणाला थोरवी मिळते तेव्हा दुष्ट चोहोंकडे हिंडत राहतात.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-