Publicidade

Salmos 82

विपरीत न्यायाला दूषण देणे
आसाफाचे स्तोत्र

1 देव दैवी मंडळीत उभा आहे,

तो देवांच्यामध्ये न्याय देतो.

2 कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल?

आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल?

3 गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे;

त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा.

4 त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा.

5 "ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत;

ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात;

पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत."

6 मी म्हणालो, "तुम्ही देव आहात,

आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात."

7 तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल,

आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल.

8 हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर,

कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-