Publicidade

Salmos 63

देव तान्हेल्या जिवांचे समाधान करतो
दाविदाचे स्तोत्र

1 हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन;

शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे;

माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे.

2 म्हणून मी तुझे सामर्थ्य आणि गौरव पाहण्यासाठी

मी आपली दृष्टी पवित्र मंदिराकडे लावली आहे.

3 कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे;

माझे ओठ तुझी स्तुती करतील.

4 म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन;

मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन.

5 माझा जीव मज्जेने आणि चरबीने व्हावा तसा तृप्त होईल;

माझे तोंड आनंदी ओठाने तुझी स्तुती करतील.

6 मी आपल्या अंथरुणावर तुझ्याविषयी विचार करतो

आणि रात्रीच्या समयी त्यावर मनन करतो.

7 कारण तू माझे सहाय्य आहे,

आणि मी तुझ्या पंखाच्या सावलीत आनंदी आहे.

8 माझा जीव तुला चिकटून राहतो;

तुझा उजवा हात मला आधार देतो.

9 पण जे माझ्या जिवाचा नाश करण्याचा शोध घेतात

ते पृथ्वीच्या खालच्या भागात जातील.

10 त्यांना तलवारीच्या अधिकारात दिले जाईल;

त्यांना कोल्ह्यांचा वाटा म्हणून देतील.

11 परंतु राजा देवाच्या ठायी जल्लोष करेल;

जो कोणी त्याची शपथ घेईल तो त्याजवर गर्व करेल,

पण जे कोणी खोटे बोलतात त्यांचे तोंड बंद होईल.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_18-40-07-