Publicidade

Salmos 131

परमेश्वराच्या सन्निध निर्धास्त असणे
दाविदाचे स्तोत्र

1 हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही.

मी आपल्यासाठी मोठमोठ्या आशा ठेवत नाही,

किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही.

2 खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे;

जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते;

तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे.

3 हे इस्राएला, आतापासून आणि सर्वकाळ

तू परमेश्वरावर आशा ठेव.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-