Publicidade

Salmos 3

प्राप्तःकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना
दावीदाचे स्तोत्र; जेव्हा तो आपला मुलगा अबशालोम याच्यापुढून पळाला.

1 परमेश्वरा, माझे शत्रू पुष्कळ आहेत!

पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे.

2 "परमेश्वराकडून त्यास काहीएक मदत होणार नाही,"

असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत. सेला

3 परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस,

तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे.

4 मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन,

आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. सेला

5 मी अंग टाकून झोपी गेलो;

मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो.

6 जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत,

त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही.

7 हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार!

कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस,

तू दुष्टांचे दात पाडले आहेत.

8 तारण परमेश्वरापासूनच आहे,

तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. सेला.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-