Publicidade

Salmos 125

परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे

1 जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात;

ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत.

2 यरूशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती

आता आणि सर्वकाळ आहे.

3 नितीमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नितीमानांच्या वतनावर चालणार नाही.

नाहीतर नितीमान जे काही चुकीचे आहे ते करतील.

4 हे परमेश्वरा, जे चांगले आहेत,

आणि जे आपल्या हृदयाने सरळ आहेत त्यांचे तू चांगले कर.

5 पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात,

परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल.

इस्राएलांवर शांती असो.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-19_11-20-24-