Publicidade

Salmos 32

क्षमेची थोरवी
दाविदाचे स्तोत्र; मासकील (शिक्षण)

1 ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे, ज्याचे अपराध झाकले गेले आहेत

ते आशीर्वादित आहेस.

2 परमेश्वर ज्याच्या ठायी काही अपराध गणत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही तो सुखी आहे.

3 मी गप्प राहिलो, तेव्हा पूर्ण दिवस माझ्या,

ओरडण्याने माझी हाडे जर्जर झाली.

4 कारण रात्रंदिवस तुझा हात माझ्यावर भारी होता.

उन्हाळ्यात उष्णतेमुळे माझी शक्ती सुकून गेली आहे.

5 तेव्हा मी परमेश्वरासमोर माझे अपराध कबूल केले,

आणि मी माझा अपराध लपवला नाही,

मी म्हणालो, परमेश्वरासमोर मी आपले पाप कबूल करीन,

आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.

6 याच कारणास्तव प्रत्येक देवभक्त तू पावशील तेव्हा तुझी प्रार्थना करो.

संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.

7 तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस. तू मला संकटांपासून वाचवशील,

विजयाच्या गीताने तू मला वेढशील. (सेला)

8 परमेश्वर म्हणतो, "मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात, तू चालावे तो मी तुला शिकवीन.

तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन.

9 म्हणून घोड्यासारखा व गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, ज्यांना काही समजत नाही.

त्यांना आवरण्यासाठी लगाम व बागदोर असलाच पाहिजे. नाहीतर ते तुमच्या जवळ येणार नाहीत."

10 वाईट लोकांस खूप दु:ख भोगावे लागेल,

परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.

11 अहो न्यायी जनहो, परमेश्वराच्या ठायी आनंद व हर्ष करा.

अहो सरळ जनहो हर्षाने तुम्ही जल्लोष करा.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-