Amizade
A amizade é um dos dons mais preciosos da vida. A Bíblia celebra amizades profundas — Davi e Jônatas, Rute e Noemi, Paulo e Timóteo — modelos de lealdade, fé e amor.
Valor da amizade
Há amigo mais chegado do que um irmão. Em todo tempo ama o amigo. A amizade verdadeira permanece nas tempestades.
ज्यांचे मित्र अविश्वासू असतात, त्यांचा नाश लवकर होतो,
पण एक असा मित्र आहे की जो भावापेक्षाही एकनिष्ठ राहतो.
ज्यांचे मित्र अविश्वासू असतात, त्यांचा नाश लवकर होतो,
पण एक असा मित्र आहे की जो भावापेक्षाही एकनिष्ठ राहतो.
खरा मित्र नेहमीच प्रेम करतो;
आणि संकटसमयासाठीच भावाचा जन्म झालेला असतो.
खरा मित्र नेहमीच प्रेम करतो;
आणि संकटसमयासाठीच भावाचा जन्म झालेला असतो.
जो कोणी प्रीतीची भावना जोपासतो तो अपराध झाकून देतो;
परंतु जो कोणी ती अप्रिय गोष्ट पुन्हापुन्हा बोलतो त्याचे जवळचे मित्र दूरावतात.
जशी लोखंडाने लोखंडाला धार लागते,
त्याप्रमाणे एक मनुष्य दुसर्याला सुधारतो.
जशी लोखंडाने लोखंडाला धार लागते,
त्याप्रमाणे एक मनुष्य दुसर्याला सुधारतो.
अत्तर आणि सुगंध मनाला आनंद देतात,
आणि अंतःकरणापासून दिलेल्या सल्ल्यातून
मित्राचा आनंद उसळून येतो.
अत्तर आणि सुगंध मनाला आनंद देतात,
आणि अंतःकरणापासून दिलेल्या सल्ल्यातून
मित्राचा आनंद उसळून येतो.
तुमचा मित्र किंवा तुमच्या कुटुंबाच्या मित्राला कधीही सोडू नका,
आणि संकटसमयी नातेवाईकांच्या घरी जावू नका—
दूर राहणाऱ्या नातेवाईकांपेक्षा जवळचा शेजारी बरा.
तुमचा मित्र किंवा तुमच्या कुटुंबाच्या मित्राला कधीही सोडू नका,
आणि संकटसमयी नातेवाईकांच्या घरी जावू नका—
दूर राहणाऱ्या नातेवाईकांपेक्षा जवळचा शेजारी बरा.
उघडपणे कान उघाडणी करणे,
गुप्त प्रीतीपेक्षा चांगले आहे.
मित्राने केलेले घाव विश्वासयोग्य असतात,
परंतु शत्रूची अनेक चुंबने कपटी होत.
सुज्ञ मनुष्याबरोबर मैत्री कर आणि सुज्ञ हो,
कारण मूर्खांच्या सोबतीने नुकसान सहन करावे लागते.
विकृत मनुष्य कलहास चेतावणी देतो,
आणि निंदानालस्ती जिवलग मित्रांना सुद्धा विभक्त करते.
तिसरे सूत्र
तापट माणसांची मैत्री करू नका,
जो शीघ्रकोपी आहे त्याच्याबरोबर राहू नका,
नाहीतर तुम्ही त्यांचाच कित्ता गिरवाल,
आणि तुम्ही स्वतःच आपला जीव पाशात घालाल.
Amizade cristã
Vós sois meus amigos se fazeis o que eu mando. Jesus nos chama de amigos — que honra imensa e responsabilidade!
आपल्या मित्रासाठी स्वतःचे प्राण अर्पण करावे, यापेक्षा कोणतीही प्रीती मोठी नाही.
आपल्या मित्रासाठी स्वतःचे प्राण अर्पण करावे, यापेक्षा कोणतीही प्रीती मोठी नाही.
मी यापुढे तुम्हाला दास म्हणणार नाही, कारण धन्याचे व्यवहार दासाला माहीत नसतात; त्याऐवजी, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून शिकून घेतले आहे, ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे.
माझी आज्ञा ही आहे: मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.
एकमेकांवर बंधुभावाने प्रीती करा आणि आपल्यापेक्षा इतरांचा आदर करा.
तुम्ही बळकट व्हावे म्हणून तुम्हाला आध्यात्मिक देणगी प्रदान करावी यासाठी भेटण्यास मी उत्कंठित झालो आहे— तर एकमेकांच्या विश्वासाकडून मला व तुम्हालाही उत्तेजन मिळावे.
परमेश्वराची प्रीती व आपली प्रीती
प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीती करू या, कारण प्रीती परमेश्वरापासून आहे. जे कोणी प्रीती करतात ते परमेश्वरापासून जन्मले आहेत आणि ते परमेश्वराला ओळखतात.
प्रिय मित्रांनो, ज्याअर्थी परमेश्वराने आपल्यावर एवढी प्रीती केली, त्याअर्थी आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. परमेश्वराला कोणीही कधीही पाहिले नाही; परंतु जर आपण एकमेकांवर प्रीती केली तर, परमेश्वर आपल्यामध्ये राहतात आणि त्यांची प्रीती आपल्यामध्ये पूर्ण झाली आहे.
परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिली आहेः जे कोणी परमेश्वरावर प्रीती करतात त्यांनी आपल्या भावावर आणि बहिणीवर सुद्धा प्रीती करावी.
Exemplos bíblicos
Davi e Jônatas fizeram aliança de amizade. Rute se apegou a Noemi. Abraão foi chamado amigo de Deus.
दावीदाविषयी शौलाची भीती वाढली
दावीदाने शौलाशी आपले संभाषण संपविले, तेव्हा योनाथानचा जीव दावीदाशी जडला आणि जशी स्वतःवर तशी प्रीती त्याने दावीदावर केली. त्या दिवसापासून शौलाने दावीदाला आपल्याजवळ ठेवले व त्याला त्याच्या पित्याच्या घरी जाऊ दिले नाही. आणि योनाथानने दावीदाशी करार केला, कारण त्याने जशी आपल्या स्वतःच्या जिवावर तशी दावीदावर प्रीती केली.
आणि योनाथानने दावीदाशी करार केला, कारण त्याने जशी आपल्या स्वतःच्या जिवावर तशी दावीदावर प्रीती केली.
दावीद आणि मेफीबोशेथ
दावीदाने विचारले, "योनाथानप्रीत्यर्थ ज्याच्यावर मी कृपा करावी असा शौलाच्या घराण्यातील कोणी अजून राहिला आहे काय?"
परंतु रूथने उत्तर दिले, "तुम्हाला सोडून जाण्याचा किंवा तुमच्यापासून परत जाण्याचा आग्रह मला करू नका. कारण तुम्ही जिकडे जाल, तिकडे मी येईन आणि तुम्ही जिथे राहाल, तिथे मी राहीन. तुमचे लोक हे माझे लोक होतील आणि तुमचे परमेश्वर हे माझे परमेश्वर होतील. तुम्ही मराल तिथे मी मरेन आणि तिथेच मला मूठमाती देण्यात यावी. मरणाशिवाय तुम्हाला आणि मला वेगळे केले तर याहवेह माझा अधिक कठोरपणे न्याय करो."
आणि जे शास्त्रलेखात सांगितले ते पूर्ण झाले, "अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले," आणि त्याला परमेश्वराचा मित्र म्हणण्यात आले.
"जो कोणी मित्रावर दया करण्यापासून स्वतःस आवरतो
त्याने सर्वसमर्थाचे भय सोडून दिले आहे.
व्यभिचारी लोकांनो,. जगाशी मैत्री परमेश्वराबरोबर वैर आहे हे तुम्हाला समजत नाही काय? यास्तव, जो कोणी जगाचा मित्र होण्याचे पसंत करतो तो परमेश्वराचा शत्रू झाला आहे.
Companheirismo
Dois são melhores do que um. Quão bom e suave é que os irmãos vivam em união! A amizade fortalece e edifica.
एकापेक्षा दोघेजण बरे!
कारण त्यांच्या कष्टाचे अधिक चांगले प्रतिफळ मिळेल:
दोघांपैकी एकजण पडला,
तर दुसरा त्याला मदत करून उठवेल,
परंतु एकजण पडला आणि त्याला उचलण्यास कोणी नसला
तर ते दयनीय आहे.
दोघांपैकी एकजण पडला,
तर दुसरा त्याला मदत करून उठवेल,
परंतु एकजण पडला आणि त्याला उचलण्यास कोणी नसला
तर ते दयनीय आहे.
एकट्या व्यक्तीवर मात करता येते,
दोघे स्वतःचा बचाव करू शकतात,
तीन पदरी दोर सहजपणे तुटत नाही.
एकापेक्षा दोघेजण बरे!
कारण त्यांच्या कष्टाचे अधिक चांगले प्रतिफळ मिळेल:
ती किती मनोरम आणि सुखदायी स्थिती असते,
जेव्हा परमेश्वराचे लोक एकोप्याने राहतात,
ती किती मनोरम आणि सुखदायी स्थिती असते,
जेव्हा परमेश्वराचे लोक एकोप्याने राहतात,
ते अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या मोलवान तेलासमान,
त्याच्या दाढीवर ओघळलेल्या,
अहरोनाच्या दाढीवर ओघळलेल्या,
झग्याच्या काठापर्यंत आलेल्या सुगंधी तेलाप्रमाणे आहे.
हे जणू सीयोन पर्वतावर पडणार्या
हर्मोनातील दवबिंदूप्रमाणे आहे.
कारण हे ते स्थान आहे,
ज्याला सार्वकालिक आशीर्वाद देण्याचा याहवेहनी संकल्प केला आहे.
एकाकी लोकांना ते कुटुंबात वसवितात,
कैद्यांना ते तुरुंगातून मुक्त करतात, तेव्हा ते आनंदाने गाऊ लागतात;
परंतु बंडखोरांच्या वाट्याला दुष्काळ आणि दुःखच येणार.
तुझ्या आई आणि वडिलांचा मान राख,’ आणि ‘जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.’ "
तुम्ही फसविले जाऊ नका: "वाईटाची संगती चांगल्या चरित्रांना बिघडवते."
तुम्ही फसविले जाऊ नका: "वाईटाची संगती चांगल्या चरित्रांना बिघडवते."