Pular para o conteúdo
Publicidade

स्तोत्रसंहिता 133

प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.

1 ती किती मनोरम आणि सुखदायी स्थिती असते,

जेव्हा परमेश्वराचे लोक एकोप्याने राहतात,

2 ते अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या मोलवान तेलासमान,

त्याच्या दाढीवर ओघळलेल्या,

अहरोनाच्या दाढीवर ओघळलेल्या,

झग्याच्या काठापर्यंत आलेल्या सुगंधी तेलाप्रमाणे आहे.

3 हे जणू सीयोन पर्वतावर पडणार्‍या

हर्मोनातील दवबिंदूप्रमाणे आहे.

कारण हे ते स्थान आहे,

ज्याला सार्वकालिक आशीर्वाद देण्याचा याहवेहनी संकल्प केला आहे.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.