Pular para o conteúdo
Publicidade

स्तोत्रसंहिता 141

दावीदाचे एक स्तोत्र.

1 हे याहवेह, मी तुमचा धावा करतो, त्वरा करा व मजकडे या,

जेव्हा तुमचा धावा करतो, तेव्हा माझे ऐका.

2 तुम्हाला माझी प्रार्थना सुगंधी धुपाप्रमाणे प्रसन्न करो;

माझे हात उभारणे सायंकाळच्या यज्ञाप्रमाणे होवो.

3 हे याहवेह, माझ्या मुखावर पहारा ठेवा;

माझ्या ओठांच्या द्वारावर नजर ठेवा.

4 माझ्या हृदयास अनीतीकडे ओढले जाऊ देऊ नका,

पातक्यांच्या सहवासात राहून,

कुकृत्यामध्ये सामील होण्यापासून मला दूर ठेवा;

त्यांची मिष्टान्ने खाण्यापासून मला अलिप्त ठेवा.

5 नीतिमान मला शासन करो—ते माझ्यासाठी कृपाच ठरेल;

त्यांनी केलेली कान उघाडणी—मला तैलाभ्यंगासारखी वाटते.

माझे मस्तक ते कधीही नाकारणार नाही,

दुष्ट माणसांच्या दुराचाराविरुद्ध मी सतत प्रार्थना करेन.

6 दुर्जनांचे पुढारी दोषी ठरून, त्यांना कडेलोटाचे शासन होईल;

तेव्हा त्यांच्या हितासाठी असलेल्या माझ्या वक्तव्याचे त्यांना स्मरण होईल.

7 ते म्हणतील, "नांगर चालविल्यानंतर जसे मातीची ढेकळे मोडून विखुरतात,

तशी आमची हाडे अधोलोकाच्या मुखावर विखुरली गेली आहेत."

8 परंतु सार्वभौम याहवेह, मी तुमच्यावरच दृष्टी केंद्रित केली आहे;

तुम्हीच माझा आश्रय आहात—मला मृत्यूच्या हवाली करू नका.

9 दुष्टांच्या फासातून माझा बचाव करा,

त्यांनी टाकलेल्या पाशापासून मला सोडवा.

10 दुर्जन त्यांच्याच जाळ्यांमध्ये अडकू दे,

आणि मी मात्र सुखरुपपणे निसटून जाईन.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.