Pular para o conteúdo
Publicidade

स्तोत्रसंहिता 87

कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. एक गीत.

1 त्यांनी पवित्र पर्वतावर त्यांच्या नगरीचा पाया घातला.

2 याकोबाच्या सर्व नगरांपेक्षा,

सीयोनाचे व्दार याहवेहला अधिक प्रिय आहे.

3 परमेश्वराच्या नगरी,

तुझ्याबद्दल या उत्कृष्ट गोष्टी कथन होतात: सेला

4 "मी नोंद करेन की, राहाब87:4 इजिप्तसाठी काव्यातील नाव आणि बाबिलोन

हे देश माझे अस्तित्व मान्य करतात—

पलेशेथ, सोर आणि कूश देखील असेच करतात—

ते म्हणतील की, ‘हा सीयोनात जन्मलेला आहे.’ "

5 खरोखर, त्या दिवसात सीयोनाबाबत म्हटले जाईल,

"हा आणि तो सीयोनात जन्मलेला आहे,

आणि प्रत्यक्ष देवाधिदेव या शहराला प्रस्थापित करतील."

6 नागरिकांच्या नोंदवहीत याहवेह लिहितील:

"याचा जन्म सीयोनात झाला आहे." सेला

7 संगीत समारंभात ते गातील,

"माझे सर्व झरे तुमच्यामध्येच आहेत."

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.