Publicidade

Salmos 113

1 याहवेहचे स्तवन करा.

हे याहवेहच्या सेवकांनो, याहवेहचे स्तवन करा;

याहवेहच्या नावाची स्तुती करा.

2 याहवेहच्या नामाचे स्तवन होत राहो,

आता आणि सदासर्वकाळ.

3 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत,

याहवेहच्या नामाचे स्तवन होवो.

4 याहवेह सर्व राष्ट्रांहून उच्च आहेत;

त्यांचे गौरव गगनमंडळाहून उंच आहे.

5 आमचे परमेश्वर याहवेह, यांच्या समान कोण आहे,

जे सर्वोच्च स्थानी सिंहासनावर विराजमान असतात,

6 जे वरून ओणवून,

गगनमंडळ आणि पृथ्वीचे अवलोकन करतात?

7 ते दीनांस धुळीतून वर काढतात,

आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्‍यातून वर उचलून घेतात;

8 ते त्यांना राजपुत्रांबरोबर,

आपल्या प्रजेच्या प्रधानांसह बसवितात.

9 ते निपुत्रिक गृहिणीला तिच्या घरात स्थिरावतात,

आणि तिला मुले देऊन आनंदी माता बनवितात.

याहवेहचे स्तवन करा.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-