Publicidade

Salmos 1

1 धन्य ते लोक,

जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत,

किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत,

आणि थट्टा करणार्‍यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत.

2 पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे,

आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.

3 ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्‍या जलप्रवाहाजवळ लावलेले असते,

जे आपल्या ऋतूमध्ये फळ देते

आणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत.

त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते.

4 परंतु दुष्ट तसे नाहीत.

ते वार्‍याने उडून जाणार्‍या

भुश्यासारखे आहेत.

5 म्हणून दुष्ट न्यायसभेत,

किंवा पापी लोक नीतिमानांच्या सभेमध्ये उभे राहणार नाहीत.

6 कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात,

परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_18-40-07-