Pular para o conteúdo
Publicidade

स्तोत्रसंहिता 110

दावीदाची रचना. एक स्तोत्र.

1 याहवेह माझ्या प्रभूला म्हणाले:

"मी तुझ्या शत्रूंना

तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत,

तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा."

2 याहवेहच सीयोनातून तुझ्या सामर्थ्यवान राजदंडाचा विस्तार करतील व म्हणतील,

"तू तुझ्या शत्रूंवर सत्ता गाजव!"

3 तुझी सेना युद्ध समयी

स्वेच्छेने तुला साथ देईल.

प्रातःकाळाच्या गर्भातून जन्मलेल्या दवाप्रमाणे

पवित्रतेने सुशोभित होऊन

तुझे तरुण तुझ्याकडे येतील.

4 याहवेहने जी शपथ घेतली आहे

आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत:

"मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे

तू सदासर्वकाळचा याजक आहेस."

5 तुझ्या उजव्या हाताशी प्रभूचे सानिध्य आहे;

आपल्या क्रोधाच्या दिवशी ते अनेक राजांना तुडवतील.

6 ते राष्ट्रांवर आपला यथार्थ निकाल घोषित करतील,

मृतदेहांचा ढीग लागेल आणि ते संपूर्ण पृथ्वीच्या शासकांना चिरडून टाकतील.

7 तेव्हा प्रभू वाटेवरील ओहोळातील पाणी पितील,

आणि आपले मस्तक उंचावतील.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.