Publicidade

Salmos 120

प्रवाशांचे आराधना गीत.

1 संकटसमयी मी याहवेहकडे आरोळी मारली,

आणि त्यांनी ती ऐकली.

2 हे याहवेह,

असत्य बोलणार्‍या ओठांपासून

व कपटी जिव्हेपासून माझा बचाव करा.

3 अगे कपटी जिभे,

ते तुला काय करतील,

आणखी तुला कशी वागणूक मिळेल?

4 ते तुला योद्ध्यांच्या तीक्ष्ण बाणांनी,

केरसुणीच्या लाकडांच्या निखार्‍यांनी दंड करतील.

5 धिक्कार असो माझा, जर मी मेशेख हे माझे निवासस्थान केले,

वा केदार येथे माझा डेरा घातला!

6 जे शांतिप्रिय नाहीत अशा लोकांसह राहण्यात

मी बराच काळ घालविला आहे.

7 मी तर शांतताप्रिय आहे;

पण मी काही बोलताच ते युद्धास तयार होतात.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_18-40-07-